आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापक्षादेश (व्हीप) मोडल्याबाबत शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर सुनावणी होईल. मात्र अपात्रतेचा निर्णय किती कालावधीत होईल, हे सांगता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. गुरुवारी लंडन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी काही मुद्दे मांडले. ते असे.
राहुल नार्वेकर म्हणाले...
१. न्यायालयाने कुठेही सांगितले नाही की त्यांचा व्हीप अध्यक्षांनी मानावा. भरत गोगावलेंना आम्ही नियुक्त केलेे नव्हते. आमच्या कार्यालयाने केवळ पक्षाने दिलेल्या माहितीची नोंद घेतली होती.
२. विधिमंडळ पक्षाच्या सांगण्यावरून आम्ही गोगावलेंना प्रतोदपदी मान्यता दिली.
३. व्हीप लागू करण्याविषयी न्यायालयाने विश्लेषण केले. राजकीय पक्ष व्हीप अपॉइंट करेल. कोणता गट राजकीय पक्ष आहे, याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा आहे. त्यानंतर निश्चित होईल की, व्हीप कोण लागू करू शकते आणि कोणता व्हीप ग्राह्य धरला जाईल. या प्रक्रियेला फॉलो केल्यावर उत्तरे मिळतील.
४. नेमका कोणता गट राजकीय पक्ष आहे, हे मी तुम्हाला आज सांगू शकत नाही. मला संपूर्ण याचिकांवर सुनावणी घेऊन, वस्तुस्थिती बघून, कागदपत्रे तपासून निर्णय घ्यावा लागेल.
५. राज्यघटनेच्या परिशिष्ट १० मध्ये स्पष्ट केले आहे, की एखाद्या सदस्याने व्हीपचे उल्लंघन केले किंवा मतदान केले नाही तर संबंधित आमदार अपात्र ठरतो. किंवा पक्षाविरोधात कारवाई केल्याने आमदार अपात्र होतात. व्हीप सभागृहात घडलेल्या गोष्टींसाठी असतो.
६. अपात्र आमदारांचा विषय निकाली काढण्यासाठी न्यायालयाने कालमर्यादा घातलेली नाही. याचिकांची सुनावणी, पुरावे तपासणी, म्हणणे मांडण्यास अवधी द्यावा लागेल. त्यामुळे किती दिवसात अपात्रतेवर मी निर्णय करेन, हे आता सांगू शकत नाही.
७. सर्वांना बाजू मांडण्याची संधी मिळेल. नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करून निर्णय केला जाईल.
८. आमदार अपात्रतेचा निर्णय न्यायालयाचा नसून विधानसभा अध्यक्षांचा आहे, असे मी सातत्याने सांगत होतो. आज तोच निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्याचे स्वागत आहे. लोकशाहीसाठी पोषक असा हा निर्णय आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.