आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रणजितसिंह जेव्हा सभागृहात चॉकलेट मागतात! विधान परिषदेमध्ये सदस्यांना शेकापच्या जयंत पाटलांकडून विदेशी चॉकलेटचा उतारा

मुंबई | अशोक अडसूळ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेत शुक्रवारी (११ मार्च) दुपारी अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी बजेट भाषणाला प्रारंभ केला. भाषणाचे सादरीकरण नीरस, त्यात जेवणानंतरची दुपारची वेळ. परिणामी अनेक सदस्यांना झोप काही आवरेना. शेवटी वेळ मारून नेण्यासाठी संपूर्ण सभागृह चाॅकलेट खाण्यात दंग झाले. शेवटच्या बाकावर बसलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तर मागणी करून चाॅकलेट मागून घेतले.

शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील (जि. रायगड) सदस्यांना विदेशी चाॅकलेट वाटण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आजच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात काही रंग भरला जात नव्हता. भाषणाला ना टाळ्या, ना घोषणा, ना बाके वाजवणे... असे काहीच नव्हते. मंत्री शंभुराज देसाई आपले खाली पाहून एकसुरी बजेट भाषण वाचत होते. शेवटी जयंत पाटील उठले अन् लाॅबीतून बॅगेत चाॅकलेट घेऊन येऊन आसनावर बसले. पाटील पहिल्या रांगेत बसतात. त्यांनी विरोधी बाकावरच्या सदस्यांना बसून ती पास केली. ते पाहून सत्ताधारी बाकावरच्या सदस्यांनी त्यांच्याकडून चाॅकलेट मागवून घेतली.

पुढील तीन रांगांतील सदस्य चॉकलेट खाण्यात दंग : विधान परिषदेत ७८ सदस्यांसाठी एकूण सहा रांगा आहेत. तीन रांगांनंतर मध्ये रस्ता असून त्यानंतर तीन रांगा आहेत. आज बऱ्यापैकी अनुपस्थिती होती. त्यामुळे पुढच्या तीन रांगांतील सर्व सदस्य चाॅकलेट खाण्यात दंग होते. अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील आता भाजप सदस्य आहेत. ते विरोधी बाकावर पाचव्या रांगेत बसतात. मध्ये रस्ता असल्याने अन् बसून चाॅकलेट पास झाल्याने त्यांना काही चाॅकेलट मिळाले नाही. सभागृहात चाॅकलेट काढताना कडक कागदाचा आवाज सर्वत्र होता होता. अगदी विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे त्यांच्या आसनावर चाॅकलेट खाण्यात दंग होत्या.

मग रणजितसिंहांनी दुसऱ्यांना चॉकलेट दिले : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मिळालेली चाॅकलेट त्यांच्या आजूबाजूच्या सदस्यांना बसून पास केली. अशा प्रकारे तिकडे ४ लाख २७ हजार ७८० कोटींचे राज्याचे बजेट सादर होत असताना नीरस बजेटच्या भाषणाने वैतागलेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी मात्र विदेशी चाॅकलेट चाखत वेळ काढला.

वैतागून चॉकलेटसाठी शिपायामार्फत निरोप धाडला
वैतागून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दारावरच्या शिपायाला हात करून बोलावले आणि पहिल्या रांगेत बसलेल्या भाईंकडून चाॅकलेट घेऊन ये, असे फर्मान सोडले. हे सर्व अर्थसंकल्प भाषण चालू असताना घडत होते. शिपाई गेला अन् जयंत पाटील यांना कानात रणजितसिंह यांचा निरोप दिला. जयंत पाटील यांनी मागे पाहिले अन् शिपायाच्या हाती बॅगेतून मूठभर चॉकलेट दिली. त्यानंतर ही चॉकलेट रणजितसिंह यांच्याकडे गेली.

बातम्या आणखी आहेत...