आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • When Will Mumbai's Local Start? When Will You Get Vadapav On The Streets Of Mumbai? When Will The Temple Open? Chief Minister Uddhav Thackeray Answers

मुख्यमंत्र्यांची उत्तर:मुंबईची लाइफलाइन कधी सुरू होणार? मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव केव्हा मिळणार? मंदिर कधी उघडणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली उत्तर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. मुंबईला तर कोरोनाने मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल आणि मुंबईची ओळख असलेला वडापाव हे सर्व कधी मिळणार याविषयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी याविषयावर उत्तर दिली आहे.

मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार?

शिवसेना खासदार आणि कार्यकारी संपादक संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारली. यावेळी मुंबईच्या रस्त्यावर जोपर्यंत वडापाव मिळणार नाही तोवर मुंबई सुरळीत झाली असं देशात कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे तो केव्हापासून सुरू होईल, असा सवाल त्यांना करण्यात आला. 'मुंबईत वडापाव मिळण्याच्या दिशेने यासोबतच मुंबई सुरळीत करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. शिवाय आणखीही बऱयाच गोष्टी आहेत त्याही मिळायला हव्यात. आपण हळूहळू त्या दिशेने जात आहोत.' असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

लोकल कधी सुरू होणार?

सध्या मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल बंद आहे. मुंबईकरांकडून सातत्याने लोकल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. आता लोकल कधी सुरू होणार यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'रेल्वे सुरू करूया. वडापाव सुरू करूया, पण एकदा काय ते एक टोक स्वीकारा. घाईगडबडीने, घिसाडघाईने तुम्हाला निर्णय घ्यायचाय? पण लक्षात घ्या, कुटुंबंच्या कुटुंबं आजारी पडताहेत आणि मृत्युमुखी पडताहेत. मग कुटुंबं मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल ते लॉकडाऊन कोण उघडणार? घराचं जे लॉकडाऊन होईल त्याचं काय? कुटुंबच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार? म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा.'

मंदिर कधी उघडणार?

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील मंदिरंही बंद करण्यात आली आहेत. हे कधी सुरू होणार यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देव हा आपल्यात आहे. देव म्हणताहेत मी तुमच्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ नका. आधी हे कोरोनाचं संकट सांभाळा.