आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:निर्बंध शिथिल असतील तेथे शाळा 17 ऑगस्टला सुरू, 5 ते 8 वीपर्यंतचे वर्ग भरतील

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत तेथे शाळांचे वर्ग १७ ऑगस्टपासून भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सांगितले.

गायकवाड म्हणाल्या, ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्ग कमी आहे, जेथे कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत अशा जिल्ह्यांत ५ वी ते ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील. तसेच शहरी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथिल केलेले असतील तेथे ८ ते १२ वीपर्यंतचे वर्ग भरतील.

ज्या गावांत कोरोना रुग्ण नाहीत, अशा गावांत ८ ते १२ वीचे वर्ग जून २०२१ पासून सुरू करण्यात आलेले आहेत. त्याला प्रतिसाद चांगला आहे. २२ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यानंतर ५ ते ७ वीपर्यंतचे वर्ग काही महिन्यांत चालू केले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यावर ते वर्ग बंद करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...