आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंचे हातवारे:बॉम्ब कुठे? बॉम्ब फोडायला हिंमत लागते; धनंजय मुंडेंचे विधानसभेत हातवारे, भाजपला विचारणा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात बॉम्ब फोडणार होते, काय झाले? बॉम्ब कुठे आहे, असा प्रश्न सामाजिक न्‍यायमंत्री धनंजय मुंडे विचारत होते. धनंजय मुंडे यांनी हातवारे करून विचारलेल्या या प्रश्नामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. सकाळी अधिवेशन सुरू होताच जयंत पाटील बोलायला उभे राहिले होते. मात्र त्‍यांच्‍यापेक्षा जास्‍त चर्चा ही धनंजय मुंडे यांची होताना दिसून येत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारा व्हिडिओ बॉम्ब विधानसभेत सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. त्‍यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अजून बरेच बॉम्‍ब बाकी आहेत, अशी घोषणा केली होती. आणि याचाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत हातवारे करत, भाजप नेत्‍यांना बॉम्‍ब कुठे आहे अशी विचारणा केली आहे. फडणवीस यांनी व्‍हिडिओ बॉम्‍ब फोडल्‍यानंतर त्‍यांना पोलिसांनी चौकशी साठी बोलावले होते. आणि यामुळे राज्‍यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे आज फडणवीस कोणता बॉम्‍ब फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र फडणवीस यांनी आज सकाळच्‍या सत्रात काही वक्‍तव्‍य केले नाही. यामुळे मात्र सभागृहात विरोधी पक्षांचा बॉम्ब कुठे आहे, कधी पडणार? असे प्रश्न खाणाखुणांनी, दबक्या आवाजातून विचारला जाऊ लागला. मुंडे तेवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी दंडही थोपटले. बॉम्ब फोडायला हिंमत लागते, असंच काहीसे ध्नंजय मुंडे यांना म्हणायचे होते, असे दिसून आले. हे करताना त्यांनी कॉलरही टाइट केली. धनंजय मुंडे यांचा विधानसभेतला हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. सत्ताधारी पक्षदेखील फडणवीसांच्या पुढच्या बॉम्बची किती आतुरतेने वाट पहात आहेत, हेच यातून स्पष्ट होतंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु

बातम्या आणखी आहेत...