आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज पार्टी प्रकरण:शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर कारवाई झालीच पाहिजे - रामदास आठवले

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत क्रुझ शिपवर शनिवारी रात्री एनसीबीने छापा टाकला. यामध्ये अभिनेता शाहरूख खानच्या मुलाचा समावेश असल्याचे समोर येताच सिने जगतात एकच खळबळ उडाली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अमली पदार्थाच्या या प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही त्यास कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जची लागण झाली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ही बाब समोर आली. फिल्मी जगतात ड्रग्जचे जाळे पसरले आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसाठी राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही आठवले म्हणाले. ते डोंबिवलीत बोलत होते. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे

प्रकरणी तिघांकडून ड्रग्ज आणि 1.33 लाख रुपये जप्त
आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांच्याकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये सापडल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी 2 मुलींसह 5 जण अद्याप कोठडीत आहेत. प्रत्येकाची चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...