आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक दृष्याने उडाली भंबेरी:रेल्वे रूळ ओलांडताना धाड्धाड् ट्रेन नव्हे मृत्यूच येत होता! आरपीएफ जवान बनला देवदूत, वाचवला तरुणाचा जीव

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेचे नियम तोडून चुकीच्या पद्धतीने एक व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडून प्लॅटफार्मवर चढण्याआधीच अचानक धाड्-धाड् ट्रेन आली. दोन सेकंदावर मृत्यू असतानाच आरपीएफचा जवान देवदुताच्या रुपात आला आणि रेल्वेखाली चिरडण्याआधीच या व्यक्तीचा जीव वाचवला.

अगदी श्वास रोखून धरायला लावणारी हि घटना ठाणे रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी 7.47 वाजता फलाट क्रमांक 4 वरील पिलर क्रमांक 16 जवळ घडली.

रेल्वे रुळ ओलांडताना अनेकदा लोकांना जीव गमवावा लागतो, तरीही लोक असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. थरारक आणि सर्वांची भंबेरी उडवणारीह हि घटना महाराष्ट्रातील ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली. याच प्लॅटफार्मवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

काय दिसले सीसीटीव्हीत?

याठिकाणी तरुणाने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोरून लोकल ट्रेन येत होती. त्याने जीव मुठीत धरला. रेल्वे पोलिस दलाचा (RPF) हवालदार त्याला पाहतो आणि मोठ्या चपळाई दाखवत त्याला रुळावरून ओढतो. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचतात असे हे सीसीटीव्हीतील फुटेज आता समोर आले आहे.

काही सेंकद उशीर झाला असता तर..?

व्हिडिओनुसार तरुण आणि लोकल ट्रेन यांच्यात फारसे अंतर नव्हते. अगदी काही सेकंदावरच मृत्यू समोर उभा ठाकला होता, या तरुणाने आपला मृत्यूच डोळ्यासमोर पाहिला पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला. दोन सेकंदही उशीर झाला असता तर या तरुणाचा जीव जाऊ शकला असता असेही तेथील स्थानिक म्हणतात.

लाइफ सेव्हिंग कॉन्स्टेबलचा गौरव होणार

लाइफ सेव्हिंग कॉन्स्टेबलचा गौरव करण्यात येणार आहे. ही घटना ठाणे रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी 7.47 वाजता फलाट क्रमांक 4 वरील पिलर क्रमांक 16 जवळ घडली. या अपघातात तरुणाला किरकोळ दुखापत झाली आहे. चुकीच्या पद्धतीने ट्रॅक ओलांडणाऱ्या तरुणाला दंड ठोठावण्यात आला, त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली आणि त्याचा जीव वाचवणाऱ्या हवालदाराचा गौरव करण्यात येत आहे.

ओडिशातही अशीच घटना घडली

याआधी ओडिशातील भुवनेश्वर रेल्वे स्थानकावरून अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मवर उतरताना चालत्या ट्रेनमधून एक महिला पडली होती. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या आरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलने घाईघाईने वृद्ध महिलेला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये जाण्यापासून वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी जीव वाचवणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचे कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...