आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका उत्सव:महाराष्ट्र कोरोनाच्या चिंतेत जळत असताना राज्य आणि केंद्रातील मंत्री मात्र ‘टीका’ उत्सवात रंगलेत

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे : पंतप्रधानांना फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सांगण्यात आले की, ते म्हणे पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत
ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला सांगण्यात आले की, ते बंगालमध्ये प्रचार दौऱ्यात आहेत, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंेद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठ्याबाबत गंभीर नसल्याची अप्रत्यक्ष टीका केली.

उद्योजक आणि विविध उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींशी व्हीसीवर बोलताना त्यांनी ही टीका केली. एकीकडे ही टीका करत दुसरीकडे केंद्र महाराष्ट्र सरकारला सहकार्य करत असल्याचे सांगत त्यांनी आपण केलेली टीका सौम्य करण्याचाही प्रयत्न केला.

पीयूष गोयल : देशात सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ऐकून वाईट वाटले
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, ऑक्सिजन पुरवठ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य ऐकून अत्यंत वाईट वाटले. आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. मदतीसाठी केंद्र सरकार रोज राज्यांच्या संपर्कात आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या रोजच्या निरर्थक राजकारणाचे डोस थांबवून आता जबाबदारी घ्यावी. महाराष्ट्र सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारच्या तावडीत असून, केंद्र सरकार लोकांसाठी शक्य तेवढे चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे.

नवाब मलिक : महाराष्ट्राला रेमडेसिविर मिळू नये यासाठी केंद्राचा दबाव
पंतप्रधान मोदींशी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते बंगाल दौऱ्यावर होते. रेमडेसिविर तयार करणाऱ्या कंपन्यांनाही महाराष्ट्राला इंजेक्शन पुरवाल तर परवाने रद्द करू, असे धमकावले जात आहे. लसीकरणाच्या कागदपत्रांवर मोदींचे फोटो आहेत, आता मृत्यू प्रमाणपत्रांवर फोटो बाकी आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

मनसुख मांडविया : मलिक यांचा दावा तर खोटारडेपणाचा कळसच
रेमडेसिविरबाबत मंत्री नवाब मलिक यांनी केलेला दावा खोटारडेपणाचा कळस आहे. १६ निर्यातदार कंपन्यांकडील साठा जप्त करून तो जनतेला पुरवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी धमकी मंत्री मलिक देत आहेत. त्यांच्या धमक्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत, असे केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...