आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • While The Cabinet Meeting Was Going On, The Lights Of The Ministry Went Out, Darkness Spread In The Hall And The Chief Minister Was Disconnected.

मुंबई:मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच झाली मंत्रालयाची बत्ती गुल, सभागृहात अंधार पसरला तसेच मुख्यमंत्री डिसकनेक्ट झाले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या प्रशासनाचे सत्ताकेंद्र असलेल्या कुलाब्यातील मंत्रालयात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच १० मिनिटांसाठी वीज गायब झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीसाठी वर्षा निवासस्थानातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. मात्र, वीज गायब झाल्याने ते बैठकीतून डिसकनेक्ट झाले. अखेर वीज गेल्याने मंत्रिमंडळ बैठक आटोपती घ्यावी लागली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी ४ वाजता सुरू झाली. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील राज्य मंत्रिमंडळ परिषद सभागृहात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच ५ वाजून ३० मिनिटांनी संपूर्ण मंत्रालयातील बत्ती गुल झाली. बैठकीत या वेळी ओबीसी आरक्षण प्रश्नावर अनौपचारिक चर्चा सुरू होती.

वीज गायब झाल्याने सभागृहात अंधार पसरला तसेच मुख्यमंत्री डिसकनेक्ट झाले. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तांत्रिक बिघाड झाल्याने वीज गेल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, प्रशासकीय इमारत व बाजूच्या इमारतीत वीज होती. सुमारे १० मिनिटांनी अभियंत्यांनी वीजपुरवठा पूर्ववत केला.

बातम्या आणखी आहेत...