आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाल:‘आम्हाला माफ करणारे तुम्ही कोण?’ संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“आम्हाला माफ करणारे तुम्ही कोण?’ असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे. तसेच, तुम्हाला माफ करायचे की नाही, हे तुम्ही नव्हे तर आम्ही व महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहोत, असेही राऊत म्हणाले.

विरोधकांनी आम्हाला प्रचंड त्रास दिला आहे. मात्र, होळीनिमित्त आम्ही त्यांना माफ करत आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर गुरुवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

राऊत म्हणाले, “भाजपने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा प्रमुख पक्ष फोडला आहे. मराठी माणूस, मराठी माणसाचा स्वाभिमान असणाऱ्या पक्षाचेच अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. यासाठी तपास यंत्रणांचा, पैशांचा गैरवापर केला. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर आघात केला. त्यामुळे त्यांना माफ करायचे की नाही, हे जनता ठरवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...