आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांचे कौतुक:डब्ल्यूएचओ प्रमुखांनी मुंबईतील धारावीचे उदाहरण देऊन म्हटले - योग्य उपाययोजना करून संक्रमणावर नियंत्रण मिळवणे शक्य

जिनिव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओ प्रमुखांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)चे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांच्यानुसार कोरोनावर नियंत्रण मिळवणे अजूनही शक्य आहे. त्यांनी इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील धारावीचे उदाहरण देत म्हटले की, या ठिकाणी परिस्थिती अत्यंत वाईट होती, परंतु लवकर योग्य उपाययोजना केल्यामुळे स्थिती नियंत्रणात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

डब्ल्यूएचओ प्रमुखांनी धारावीमधील झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले “धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले”. 

कोरोना संक्रमण साखळी तोडणे शक्य

डब्ल्यूएचओ चीफनुसार, कम्युनिटी एंगेजमेंट, टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेटिंग आणि सर्व कोरोनाबाधितांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित केल्यास कोरोनाची साखळी तोडणे आणि संक्रमण थांबवणे शक्य आहे. प्रत्येक देशाच्या काही मर्यादा आहेत. ज्या ठिकाणी शिथिलता देण्यात येत आहे तेथे संक्रमण वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास फायदा होऊ शकतो.

0