आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्लॅटफॉर्म ते राजकारणापर्यंतचा प्रवास:एक ट्रांसजेंडर बनल्या देशातील पहिल्या LGBT पॉलिटिकल सेलच्या प्रमुख, 13 वर्षांची असताना आईने घरातून काढून दिले होते, अनेकदा उपाशी राहून काढल्या रात्री

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक तंगीचा सामना करत ट्रांसजेंडर प्रिया 13 वर्षांच्या झाल्या, तेव्हा समाज, कुटुंब आणि आईही त्यांच्या विरोधात गेल्या आणि त्यांना घराबाहेर काढले
  • विरार रेल्वे स्टेशनवर राहत असताना त्यांना अनेक वेळा लैगिंक शोषणाचा सामना करावा लागला, अनेक रात्री उपाशी राहवे लागले आणि एक जोडी कपड्यांमध्ये वर्षभर राहिल्या

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा एलजीबीटी समुदायासाठी स्वतंत्र सेल सुरू करणारा देशातील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. सोमवारी मुंबईत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईच्या ट्रान्सजेंडर प्रिया पाटील यांना या सेलचे अध्यक्ष केले. वर्षभर विरार स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या प्रिया पाटील यांनी राजकारणापर्यंतचा आपला प्रवास शेअर केला.

वयाच्या 13 व्या वर्षी आईने घराबाहेर काढले
3 जुलै 1987 रोजी मुंबईला लागून वसई-विरार येथे मुलगा म्हणून जन्मलेल्या प्रियाचे बालपण हालाकीत गेले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांना समजले की त्या एका सामान्य मुलापेक्षा काही वेगळ्या आहेत. जेव्हा त्या 10 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील आई आणि त्यांना सोडून निघून गेले.

आर्थिक अडचणींचा सामना करून त्या 13 वर्षांच्या झाल्या. तेव्हा समाज, कुटुंब आणि त्यांची आईसुद्धा त्यांच्याविरुद्ध गेली. त्यांचे मुलींसोबत राहणे कुटुंबीयांना आवडले नाही आणि एक दिवस आईने त्यांना घराबाहेर काढले.

2017 मध्ये बीएमसीमधून लढवली निवडणूक
2017 मध्ये बीएमसीमधून लढवली निवडणूक

एक वर्ष प्लॅटफॉर्मवर राहिल्या
प्रिया पाटील पुढे म्हणाल्या की घर सोडल्यानंतर त्या मुंबईतील विरार रेल्वे स्थानकावर आल्या. सुमारे एक वर्ष इथे राहिल्या. यावेळी, दोन-तीन दिवस जेवणही मिळत नव्हते. लोकांचे उष्टे खाल्ले आणि अनेक वेळा लैगिंक शोषणाचा सामना करावा लागला. एका वर्षे त्यांच्याकडे फक्त एक कपडा होता आणि आंघोळ केल्यावर ते कपडे वाळेपर्यंत त्या विना कपड्यांच्या झाडांमध्ये लपून राहत होत्या.

2002 मध्ये विरार रेल्वे स्टेशनवरच त्यांची भेट ट्रान्सजेंडर कम्युनिटीसंबंधीत काही लोकांसोबत झाली आणि पोट भरण्यासाठी त्यांनी त्याच्यासोबत ट्रेनमध्ये भीक मागायला सुरुवात केली. लोकांच्या घरात बधाई देण्यासाठी जाण्याचे काम प्रिया यांनी सुरू केले.

संसदेत पोहोचून त्यांच्या समुदायाला न्याय देण्याचे प्रिया यांचे स्वप्न
संसदेत पोहोचून त्यांच्या समुदायाला न्याय देण्याचे प्रिया यांचे स्वप्न

फ्रेंडच्या मृत्यूनंतर राजकारणात जाण्याचे ठरवले
प्रिया यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये भीक मागून काम करणारी त्यांची फ्रेंड एक दिवस पोलिसांपासून बचाव करण्यासाठी ट्रेनच्या वर चढली आणि ओव्हरहेड वायरला लागून वाईट पध्दतीने भाजली. या घटनेनंतर ती आठ दिवस रुग्णालयात होती, मात्र योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.

असा झाला राष्ट्रवादीत प्रवेश
फ्रेंडच्या उपचारांवर झालेले दुर्लक्ष पाहून प्रियाने ठरवले की, यापुढे कुणासोबतही असे होऊ देणार नाही. यासाठी त्या प्रयत्न करतील. यानंतर त्यांनी पहिले एक एनजीओ जॉइन केली आणि नंतर 2017 मध्ये बीएमसीच्या कुर्ला वेस्ट वार्ड-166 मधून निवडणूक लढवली. मात्र यामध्ये त्यांचा पराजय झाला. मात्र त्या हिंमत राहल्या नाहीत आणि मार्च 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

2019 मध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
2019 मध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

प्रियांच्या आयडिया आणि सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांनी बनली सेल
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्ष मजबूत करण्याचे काम केले आणि घराघरात जाऊन मतं मागितली. मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीदरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात त्यांना माहिती मिळाली की, त्यांच्या समुदायासंबंधित लोकांना खायला अन्न नाही. अनेकांना त्यांच्या घराबाहेर काढून टाकले आहे.

यानंतर त्यांनी समुदायातील लोकांना आर्थिक मदत पोहोचवली तसेच यापुढे असे होऊ नये यासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि पक्षात ट्रान्सजेंडर सेल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव पुढे घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यामध्ये एलजीबीटी समुदायाशी संबंधित लोकांचा समावेश असेल. अशा प्रकारे, देशातील पहिले एलजीबीटी सेल तयार केले गेले.

प्रियासह एलजीबीटी समुदायासंबंधीत 15 जणांनी हे सेल जॉइन केले.
प्रियासह एलजीबीटी समुदायासंबंधीत 15 जणांनी हे सेल जॉइन केले.

प्रिया पाटील यांचे संसदेत पोहोचण्याचे स्वप्न
प्रिया म्हणाल्या मला लहानपणापासूनच लाल दिव्याच्या गाडीत फिरायचं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आता हे शक्य नाही, परंतु मला आशा आहे की एक दिवस मी माझ्या समुदायाचा आवाज बनून विधानसभा किंवा संसदेत बोलू शकेल. प्रिया म्हणाल्या की हे करण्यामागील कारण म्हणजे या समाजातील लोकांना देखील समान हक्क मिळावेत.

बातम्या आणखी आहेत...