आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा टोला:योग्य कोण आहे, तुम्ही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी? जयंत पाटील यांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली

देशभरात कोरोनाचा कहर आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीही गंभीर होत असताना दिसत आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कोरोनाच्या लढाईचे कौतुक केले आहे. स्वतः पंतप्रधानांनी राज्य सरकारचे कौतुक केले असताना दुसरीकडे राज्यातील भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यास ठाकरे सरकार कमी पडले असे बोलले जात आहे. यावर आता जयंत पाटलांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना 'योग्य कोण, माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही?' असा खोचक सवाल विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत असताना राज्य सरकारने कोरोना नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. मात्र असे असताना राज्यातील भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत आहेत.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणे,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना खोचक सवाल केला आहे.

देवेंद्र फडणीसजी... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, माननिय पंतप्रधान की तुम्ही?

बातम्या आणखी आहेत...