आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण:​​​​​​​रियाला हे कोण सांगतेय? ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग? सुशांतच्या बहिणीवर दोन तासात एफआयआर दाखल करण्यावरुन आशिष शेलारांनी उपस्थित केला सवाल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीने अटक होण्यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणीविरोधा वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळे वळण घेताना दिसत आहे. आता सुशांतची गर्लफ्रेंड आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी रियाने सुशांतची बहीण प्रयंकाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरुन तात्काळ गुन्हा दाखल झाला. यावरुन आशिष शेलारांनी सवाल उपस्थित केला आहे.

या प्रकरणी तात्काळ झालेल्या कारवाईवरुन आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.' रियाने अटकेच्या वेळेस वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि दोन तासात सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी विरूद्ध FIR दाखल झाला. परंतु सुशांतच्या मृत्यू प्रकरणात 65 दिवस FIR दाखल का झाला नाही? रियाला हे कोण सांगतेय? ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग?' असे काही सवाल शेलारांनी उपस्थित केले आहेत.

रिया चक्रवर्तीने अटक होण्यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणीविरोधा वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन सुशांतच्या बहिणीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतची बहीण प्रियंका सिंह हिने सुशांतला काही औषधे दिली असे तिने तक्रारीत म्हटले होते. यानंतर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुण कुमार आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...