आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून आणखी एक पोलखोल:राज्य सरकारची मुंबईतील एक एकर जागा विकणारा तो मंत्री कोण? आशिष शेलार यांचा प्रश्न

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात 'पोलखोल' सभा घेण्यात येत आहेत. या मालिकेचा पुढचा टप्पा म्हणून वांद्रे येथील राज्य सरकारची एक एकर जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचे बिल्डरशी लागेबांधे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आशिष शेलार पुढे म्हणाले, वास्तविक अल्पसंख्याक समाजातील रुग्णांसाठी ही जागा संस्थेला देण्यात आली होती. मात्र, कालांतराने ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यात आली. या सर्व प्रकरणात सर्व खर्च काढल्यानंतर बिल्डरला निव्वळ नफा 1 हजार 3 कोटींचा होणार आहे. रूस्तूमजी नावाच्या बिल्डरला हा नफा मिळाला आहे. मात्र, ही जागा केवळ 234 कोटी रुपयात विकण्यासाठी सर्व परवानग्या देण्यात आल्या.

तो मंत्री कोण ?

या प्रकरणात बिल्डरला फायदा मिळवून देणारा महाविकास आघाडी सरकारमधील कोणता मंत्री असल्याचा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. गरीब रुग्णांच्या विश्रांतीसाठी बारा हजार स्क्वेअर फूट तर विकासकाला 1 लाख 90 हजार स्क्वेअर फूट जागा ते देखील संपूर्ण मालकीसह देण्यात आली असल्याचे शेलार म्हणाले.

... तर राज्य सरकारला फायदा

ही संपूर्ण जागा महाराष्ट्र राज्य सरकारच्या मालकीच्या आहे. तसेच या भागात जागांचे भाव महागडे आहेत. अशा भागातली जागा भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारला मिळणार होती. मात्र, त्याचवेळी ही जागा बिल्डरला विकण्यात आली. ही जागा सरकारच्या ताब्यात आली असती तर सरकारला फायदा झाला असता, असा दावादेखील शेलार यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...