आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

घोषणेच्या वादात राऊतांची उडी:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा बुधवारी शपथविधी सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील 6 खासदारांनी यावेळी शपथ घेतली. याच वेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. यानंतर या घटनेची बरीच चर्चा झाली. याचा व्हिडिओही व्हायरल झाला. यानंतर आता या घटनेबद्दल राजकारण सुरू आहे. दरम्यान शिवप्रेमींकडून या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता या वादात शिवसेना खासदार संजय राऊतांनीही उडी घेतली आहे. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी याविषयावर ट्विट केले आहे. त्यांनी भाजपा आणि संभाजी भिडेंवर टीकास्त्र साधले आहे. राऊत म्हणाले की, 'छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून  सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही. असे म्हणत त्यांनी जय भवानी!जय शिवाजी! अशी घोषणा ट्विटरवरुन दिली आहे. 

दरम्यान शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजयुमोच्या वतीने त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर 'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड राज्यभरातून पाठवणार आहेत. त्यालाच उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून व्यंकय्या नायडूंना 20 लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं.