आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक संवाद:पंकजा पक्ष सोडणार हे तुम्ही ठरवणारे कोण... हे मी अन् माझे कार्यकर्ते ठरवतील : पंकजा मुंडेंचा दावा

बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘अप्पा मला बळ द्या’ धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट

‘मी पक्ष सोडणार, अमुक तारखेला निर्णय जाहीर करणार, असे सांगितले जात आहे. परंतु, यावर विश्वास ठेवू नका. पंकजा मुंडे पक्ष सोडणार हे तुम्ही ठरवणारे कोण? पंकजा काय करणार? हे पंकजा आणि कार्यकर्तेच ठरवतील, अशा शब्दांत बुधवारी मुंबईतून पंकजा मुंडे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी त्यांनी मुंबईतून फेसबुक लाइव्हवरून संवाद साधला. त्या म्हणाल्या, मला काही नको. मला फक्त तुमची गरज आहे. प्रारंभी पंकजांच्या फेसबुक पेजवरून डॉ. प्रीतम मुंडे यांचे गोपीनाथगडावर केलेले अभिवादन लाइव्ह करण्यात आले. नंतर वरळीहून पंकजा यांनी लाइव्ह होत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रमुख सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांशी आपला कायम संवाद सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

डॉ. प्रीतम मुंडेंनी गडावर जाऊन घेतले दर्शन

पंकजा यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत लाखो मुंडेप्रेमींनी घरात राहूनच बुधवारी गोपीनाथराव मुंडे यांना सहाव्या स्मृतिदिनी अभिवादन केले. पंकजा यांनी परिवारासह मुंबईतील निवासस्थानी तर खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी सकाळी साडेअकरा वाजता परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर समाधीचे दर्शन घेतले.

‘अप्पा मला बळ द्या’ धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट

परळी | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगड येथे जाऊन बुधवारी आपले काका स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. दरम्यान, धनंजय यांनी गोपीनाथराव मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत, असे सांगणारा एक संग्रहित व्हिडिओ पोस्ट करून “अप्पा मला बळ द्या...’ अशी भावनिक पोस्ट केली आहे.

बातम्या आणखी आहेत...