आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांकडून कोल्हेंची पाठराखण:अमोल कोल्हे यांनी सिनेमात नथुरामांची भूमिका साकारलीय, याचा अर्थ ते त्या विचारांचे समर्थन करतात असा होत नाही!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटात केलेली नथूराम गोडसेच्या भूमिकेवरुन वाद निर्माण झाला आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली, असे म्हणत शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?
कोणत्याही कलाकारने एखादी भूमिका केली तर ती तो कलाकार असतो. याचा अर्थ तो त्या व्यक्तीच्या विचारांचा समर्थक असतोच असे नाही. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावे लागेल. गांधी सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता', असे म्हणत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भूमिकाचा संबंध राजकीय विचारांशी जोडू नये- कोल्हे
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, या चित्रपटाचे चित्रिकरण 2017 मध्येच झाले होते. तेव्हा मी सक्रीय राजकारणात नव्हतो. तसेच, आपण एखादी भूमिका साकारतो म्हणून ती भूमिका वैचारिक पातळीवर स्वीकारली असे होत नाही. काही वेळा आपण एखाद्या विचारांशी, भूमिकेशी सहमत नसतो. मात्र, त्या भूमिका आव्हानात्मक असतात. त्यामुळे कलाकार ती भूमिका करत असतो. मुळात मी माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्या भूमिकाचा संबंध राजकीय विचारांशी जोडू नये, असे अवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...