आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सामना'तून ठाकरेंची जळजळ:भाजप नेते शेलारांचे उत्तर; म्हणाले - मराठी सण उत्सव साजरे केल्याने पेंग्विन सेनेला एवढा त्रास का?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सण उत्सव साजरे केल्याने पेंग्विन सेनेला एवढा त्रास का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये भाजपने मराठी दांडिया आयोजित केला. त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच, अशी टीकाही त्यांनी केलीय.

शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर दांडियावरून टीकास्त्र डागण्यात आले आहे. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेला जळजळ मळमळ होत असेल तर, मग घ्या ना धौती योग, असे म्हणताना एक पत्र काढत रोखठोक टीका करण्यात आली आहे.

आशिष शेलार म्हणाले?

ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली.. ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरू आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग!"

दरवर्षीच उत्सव साजरा करतो

भाजपा दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत. घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे 'करून दाखवले" असे होर्डिंग लावले नाहीत. पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता थापा' पण राहिला नाही आणि उत्सवही ... यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली.

पेग्विन सेनेला एवढा त्रास का?

शेलार टीका करताना म्हणाले की, अहंकार, गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना....प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा। क्लेशांपासुनि सोडवी, तोडी भवपाशा ॥ असे म्हणत त्यांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली आहे.

बातम्या आणखी आहेत...