आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल-डिझेल किंमती:पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? की बिलच पाहत नाही? जितेंद्र आव्हाडांचा बिग बींना खोचक सवाल 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये? असा सवालही त्यांनी अमिताभ बच्चन यांना केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीवरून गुरुवारी अभिनेता अक्षय कुमारला तीन सवाल केले होते. आज आव्हाडांनी याच मुद्द्यावरून बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही आता पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? की, पेट्रोल भरल्यानंतर बील पाहत नाही?; असा खोचक सवाल आव्हाड यांनी बच्चन यांना केला आहे.

इंधन वाढीवरुन जितेंद्र आव्हाड सरकारला नेहमीच लक्ष्य करत असतात. आता आव्हाडांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना खोचक टोले लगावले आहेत. अमिताभ यांच्या 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचा उल्लेख करुन आव्हाडांनी अमिताभ बच्चन यांना घेरले आहे. 2011 साली मनमोहन सिंग यांचे सरकार होते तेव्हा इंधन दरवाढीवर अमिताभ बच्चन यांनी मिश्कील भाष्य करणारे एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी ग्राहक आणि पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याचा संवाद लिहिला होता. 'पेट्रोल पंपवरील कर्मचारी- किती रुपयाचं भरू? मुंबईकर- कारवर 2-4 रुपयांचं स्प्रे कर. जाळायची आहे,' असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.

या ट्विटचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं की, तुम्ही पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? की तुम्ही बील बघत नाही? आता तुम्ही बोलायलाच हवं. हीच ती वेळ आहे. तुम्ही निश्चितच पक्षपाती नसाल अशी कोपरखळीही त्यांनी काढली आहे. आव्हाड यांनी बच्चन यांना काढला आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये? असा सवालही त्यांनी अमिताभ बच्चन यांना केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...