आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदे रविवारी अयोध्येत:शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून लखनऊला जाणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून लखनऊला जाणार आहेत. रविवारी दुपारी १२.३० वाजता ते महाआरती करणार असून त्यानंतर ते राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी करणार आहेत. दुपारी २.३० वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पुन्हा ६ ते ७ या वेळेत शरयू नदीच्या महाआरतीला उपस्थित राहणार आहेत. शिंदे रविवारी रात्री नऊच्या सुमारास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. रात्री १०.३० वाजता मुंबईला विमानाने रवाना होतील. मे महिन्यात भाजपकडून अयोध्येत भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या वेळी शिंदे पुन्हा अयोध्येत जाऊ शकतात.