आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Will Lock Down Increase In Areas Infected With Mumbai? Access To Shops May Be Allowed In Districts That Are Infected Due To Access Restrictions

शक्यता:मुंबईसह जास्त संसर्ग झालेल्या भागांत लॉकडाऊन वाढणार? प्रवेशबंदीमुळे संसर्ग टळलेल्या जिल्ह्यांत दुकाने सुरू करण्यास मिळू शकते परवानगी 

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • १५ एप्रिल रोजी लॉकडाऊनची मुदत संपणार
  • मुंबई व परिसरात काेरोनाचा संसर्ग आटोक्यात येईना
  • एकट्या मंुबईत रुग्णांचा आकडा पोहोचला १००८ वर

चंद्रकांत शिंदे

केंद्राने घोषित केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिलला संपत आहे. लॉकडाऊनबाबत केंद्रीय स्तरावर योजना आखली जात आहे. कोरोनाचा प्रभाव जास्त असलेल्या ठिकाणांसाठी वेगळी नियमावली तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत रुग्णसंख्या जास्त असल्याने पुढेही लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे राज्य सरकारने ठरवले असल्याची माहिती मंत्रालयातील खात्रीलायक सूत्रांनी दिली.

अनेक जिल्ह्यांत संसर्ग वाढत चालल्याने सरकारपुढे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक सोशल डिस्टन्सिंग धुडकावून बाजारात गर्दी करत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मात्र अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नाही. या जिल्ह्यातील अनेक गावांनी बाहेरच्यांना प्रवेशबंदी केल्याने कोरोनाचा प्रसार तेथे झाला नाही. ही बाब लक्षात घेऊन या गावांमध्ये दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जेथे कोरोनाचा प्रसार जास्त आहे तेथे मात्र कोणतीही सवलत देण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही. 

मुंबईत दाट झोपडपट्ट्यांत कोरोनाचा शिरकाव

मुंबईतील दाट झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धारावीत रुग्ण व बळींचा आकडा वाढत आहे. त्यातच अनेक डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांनाही लागण झाली आहे. त्यामुळे काही रुग्णालये सील करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या व्हीसीत मुंबईत लॉकडाऊन वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. 

अखेर एसआरपीएफला मुंबईत उतरवले जाणार 

आता मुंबईत एसआरपीएफला उतरवले जाणार आहे. कोरोनाचे रुग्ण जास्त असलेल्या भागात संपूर्ण संचारबंदी लागू केली जाणार आहे. जे संचारबंदीचा नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. रुग्णसंख्या कमी असलेल्या भागातील दुकाने आणि अन्य गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. मुंबईतील कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मुंबईत लोकल सेवा सुरू राहिल्यास रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे मुंबईतील लोकल बंद ठेवणे अतिआवश्यक असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...