आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करू:मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, मविआ काळात विकास कामे ठप्प असल्याचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईला दोन वर्षांत खड्डेमुक्त करू. येत्या दोन वर्षांत मुंबईतील सर्व खराब रस्त्यांची डागडुजी करुन ते चांगले बनवेल जातील, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

राज्यभरातील खड्डे बुजवण्यास वेळ लागेल

मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची दिशा काय असेल, यावर सविस्तर भाष्य केले. सध्या राज्यभरातील अनेक शहरांमध्ये नागरिक खड्ड्यांनी त्रस्त आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यभरातील सर्व खड्ड्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास वेळ लागेल. मात्र, मुंबईतील सर्व खड्डे येत्या दोन वर्षांत बुजवू. मुंबईतील सर्व रस्ते पक्के सिमेंट क्राँक्रिटचे करण्यात येतील. जे रस्ते खराब आहेत किंवा ज्या मार्गावर प्रचंड खड्डे आहेत, अशा सर्व रस्त्यांची डागडुजी येत्या दोन वर्षांत केले जाईल. त्यामुळे मुंबईकरांचा रस्त्यावरील प्रवास अधिक आरामदाई होईल.

आता वेगाने विकासकामे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी आम्ही हे सरकार स्थापन केले नाही. आमचे सरकार व सर्व मंत्री हे सर्वसामान्यांसाठी काम करणारे आहेत. अडीच वर्षांपूर्वी राज्यात सरकार कसे चालत होते, हे सर्वांनी पाहिले आहे. अडीच वर्षे सर्व कामे ठप्प होती. आता विकास होत आहे. पायाभूत सुविधांचे काम वेगाने होत आहे. लोक जल्लोषाने सणही साजरे करत आहेत.

2024 मध्ये मुख्यमंत्री होणार का?

शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्री बनवणार का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री बनवणे हे जनतेचे काम आहे. जनतेची इच्छा असेल तर कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. मला फक्त जनतेचा विकास करायचा आहे. लोकांसाठी कल्याणकारी योजना करायच्या आहेत. आम्हाला फक्त चांगल काम करायच आहे. बाकी सर्व जनतेच्या हातात आहे.

ठाकरेंच्या मनात काही तरी होते

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हाच सरकार बदलण्याची स्क्रिप्ट लिहिली गेली होती. भाजप आणि शिवसेनेला एकत्र काम करण्याचा जनादेश मिळाला होता. त्यामुळे शिवसेना व भाजपने एकत्र यावे, अशी जनतेची इच्छा होती. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत काही अडचण असती तर त्यावर तोडगा काढता आला असता. पण उद्धव यांनी आधीच निर्णय घेतला असावा. नाहीतर निवडणूक निकालानंतर लगेच कोण म्हणतं की, आमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनात आधीच काहीतरी चालू होतं

बातम्या आणखी आहेत...