आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मराठा समाजाच्या हक्कासाठी मागे हटणार नाही, मराठा समाजाला भडकवण्याचे काम करू नका : मुख्यमंत्री

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रानेही भूमिका घ्यायला हवी

मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही हटणार नाही. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात सर्वांना विश्वासात घेतले जाईल. सरकार याप्रश्नी प्रामाणिक आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राजकारणासाठी मराठा समाजाला भडकावण्याचे काम कुणी करू नका, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. वर्षा निवासस्थानी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील, अभ्यासक यांच्यासमवेत व्हीसीद्वारे बैठक घेतली. न्यायालयीन लढाईच्या अनुषंगाने त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या.

केंद्रानेही भूमिका घ्यायला हवी
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याचे म्हणणे मान्य केले आहे. दुसरीकडे नोकऱ्या, प्रवेशांना स्थगिती दिली आहे. वास्तविक पाहता इतर राज्यांतही आरक्षणाच्या बाबतीतल्या प्रकरणांमध्ये स्थगिती नाही. पण केंद्रानेदेखील यात आपली भूमिका घ्यायला हवी, असे ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...