आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी पलटवार केला आहे. कर्नाटकची इंचभरही जमीन देणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
येदियुरप्पा म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवू शकते. सच्चे भारतीय म्हणून उद्धव ठाकरे देशाच्या संघराज्यीय तत्त्वांचा आदर करतील, अशी मला आशा वाटते.’ दरम्यान, कर्नाटकात काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
सीमाभाग महाराष्ट्रात आणणे हीच श्रद्धांजली : उद्धव
कर्नाटकातील बेळगाव, कारवार निपाणीसह शेकडो गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करत असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी १७ जानेवारीला ‘हुतात्मा दिन’ पाळत असते. सीमा प्रश्नातील हुतात्म्यांना अभिवादन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.