आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अयोध्या राम मंदिर:निमंत्रण आले तरी भूमिपूजनासाठी अयोध्येत जाणार नाही, सद्य परिस्थितीत राज्यातच राहणे महत्त्वाचे : शरद पवार

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत
Advertisement
Advertisement

भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले तरी मी अयोध्येला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची तयारी वेगात सुरू आहे. सध्या कोणा कोणाला निमंत्रण दिले जाणार यावरून चर्चा रंगत आहे या पार्श्वभूमीवर पवारांनी हे स्पष्ट केले आहे. ‘राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत. सध्या कोरोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातच राहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
0