आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:राज्यातील उद्योगांचे वीजदर कमी करणार : डॉ. राऊत, 9200 कोटींच्या क्रॉस सबसिडीचा भार उचलणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक साहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. देशात केवळ महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या विजेचा अतिरिक्त आर्थिक भार क्रॉस सबसिडीच्या रूपात महाराष्ट्रात लावण्यात आला आहे. उद्योगावरील क्रॉस सबसिडीचा भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने हा भार स्वतः स्वीकारायला हवा आणि तशी अर्थसंकल्पात तरतूद करावी यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करणार आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. राज्यातील कृषिपंप ग्राहकांना ६००० कोटी रुपये तसेच उद्योग, यंत्रमाग व सूतगिरण्या यांना ३२०० कोटी रुपये अशा एकूण ९२०० कोटी रुपयांचा क्रॉस सबसिडीचा भार वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांवर सध्या येत असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहावर मंगळवारी उद्योगांना वीज दरात सवलत, ओपन अॅक्सेस आदी विषयांवर राज्याचे उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी बैठक आयोजित केली.

बातम्या आणखी आहेत...