आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर गुन्हे प्रतिबंधक केंद्राचे उद्घाटन:सायबर क्राईमचा व्हायरस रोखण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आपल्या देशात असो वा महाराष्ट्रात सायबर क्राईम चे प्रकार अधिक वाढले आहे. अनेक नागरिक या सायबर क्राईमला बऴी पडतात. दरम्यान सायबार क्राईम केसेस जास्तहून अधिक आपल्याला मिळतात. सायबर क्राईम करणाऱ्यांची संख्या देखील अधिक प्रमाणात आहे. तसेच या सायबर क्राईम मध्ये तरूणांचे जास्त योगदान आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. याचा देखील आपले पोलिसदल सक्षमपणे मुकाबला करेल यात शंका नाही. पोलिस आपल्या मदतीला आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कार्यरत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र पोलिस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिस व्हावे, तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात यावी. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी राज्यशासन खंबीर उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सेंट्रल हॉलमध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री कार्यक्रमात बोलत होते.

आजपासून कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले असले तरी पोलिसांच्या कामामध्ये फारसा बदल झालेला नाही. कोरोनामध्ये निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तर आता नेहमीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे. आता काळ बदलला आहे आणि गुन्हेगाराच्या पुढे जाऊन पोलिसांना विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस दलाला सर्व सुविधा व अत्यावश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसदलाला तीन ते साडे तीन हजार दुचाकी आणि चार चाकी अद्ययावत वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

गुन्हेगारांशी लढण्याची पोलिसांमध्ये जिद्द
पोलिसांचा धाक व दरारा वाटला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण अजूनही कसाबला विसरलेलो नाही. अतिरेकी किती विचारपूर्वक आणि शस्त्रसज्ज होऊन घुसले. पण तुकाराम ओंबाळेसारख्या पोलीस हवालदाराने जीवाचे बलिदान दिले. पण त्यापूर्वी त्या अतिरेक्याला रोखले. गुन्हेगारांशी लढण्याची जिद्द पोलिसांमध्ये पाहिजे आणि ती आपल्यात निश्चितपणे आहे याची खात्री असून महाराष्ट्र पोलिस दलाचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (ग्रामीण), सतेज पाटील (शहरे), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अपर मुख्य सचिव सुरक्षा आणि अपील नितीन गद्रे, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...