आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड सेंटर कंत्रात प्रकरण:'पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?' मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधत मनसेचा सवाल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात कुणीही राजकारण करु नका असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत आहेत. मात्र राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सुरु असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे. कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले असा आरोप त्यांनी मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकरांवर केला आहे.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, किशोरी पेडणेकर यांनी आपल्याच मुलाला कोविज सेंटरचे कंत्राट दिले आहे. त्यांनी महापौर पदाचा गैरवापर केला आहे. सर्वात पहिले त्यांनी राजीनामा द्यायला हवा असेही ते म्हणाले. तसेच देशपांडे यांनी ट्विटही केले आहे. यामध्ये ‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

कोविड काळामध्ये महापालिकेमध्ये मोठे घोटाळे झाले. घोटाळे करण्यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे. कोविड सेंटर्सच्या नावाखाली शेकडो कोटींचे घोटाळे झाले. किश कंपनी नेमकी कोणाची आहे? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर आरोप केले आहे. मात्र किशोरी पेडणेकर यांनी या सर्व आरोपांचे खंडन केल्याचे वृत्त आहे.

बातम्या आणखी आहेत...