आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे गृहमंत्री:पोलिस दलातील ‘संघनिष्ठ’अधिकाऱ्यांची माहिती घेणार, गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच वळसे पाटील यांचा इशारा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला. - Divya Marathi
नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला.
  • अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशी सुरू

राज्याच्या पोलिस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा असलेले अनेक अधिकारी आहेत. याबाबत सर्व माहिती घेण्यात येईल. कुणाच्या काय निष्ठा आहेत त्याची माहिती घेऊन आवश्यक तसा निर्णय घेऊ, असा इशारा नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वळसे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृहखात्याचा पदभार पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणे स्वाभाविक आहे. त्यातून कसा मार्ग काढायचा याबाबत विचार केला जाईल. कठीण काळात गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्त्वाची बाब आहे. तसेच प्रशासकीय कामात माझ्याकडून हस्तक्षेप होणार नाही, अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात केंद्रीय तपास संस्था तपास करणार आहे, केंद्राच्या या तपास संस्थांना राज्य पोलिस दलाचे पूर्ण सहकार्य राहील, असे ते म्हणाले.

अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशी सुरू
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने मंगळवारी प्राथमिक चौकशी अहवाल (पीई ) नोंद केला. सीबीआयचे पथक दुपारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर संबंधित दस्तऐवज गोळा केल्यानंतर प्राथमिक चौकशी सुरू केली.दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकार आणि स्वत: अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात अाव्हान दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...