आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने कारागृहात बंदीस्त केले. आता न्यायालयाने याच विषयावर टिप्पणी करीत मत व्यक्त केले असून महाविकास आघाडी माफी मागणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाविकास आघाडीवर वारंवार प्रहार करीत आहेत. राणा दाम्पत्याच्या अटकेवरुन भाजपने रान उठविले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. यावरुन न्यायालयाने टिप्पणी करीत आपले मत व्यक्त केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढविला.
काय आहे फडणवीसांचे ट्विट
महाविकास आघाडी सरकारच्या कठोर आणि लोकशाही विरोधी धोरणांचा आणि विरोधस करणाऱ्यांचा आवाज बंद करण्यासाठी केलेल्या कृतींचा न्यायालयाने पर्दाफाश केला आहे. लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार आता माफी मागणार का? असा सवालही त्यांनी केला. यासोबतच मुंबई सत्र न्यायालयाने व्यक्त केलेले मतही त्यांनी ट्विटद्वारे जाहीर केले आहे.
काय आहे मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण?
राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, यावरून मुंबई पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्यावर लावण्यात आलेला राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या निरीक्षणावर अनिल परब काय म्हणाले?
राणा दाम्पत्यावर दाखल राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत मुंबई सत्र न्यायालयाने केवळ निरीक्षण नोंदवले आहे. तो निकाल नाही. तरीदेखील न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे, त्याचा आम्ही व्यवस्थित अभ्यास करू. एखाद्या बाबतीत आम्हाला खुलासा करायचा असल्यास त्याबाबतही विचार करू, असे अनिल परब यांनी सांगितले आहे. तसेच, गरज पडल्यास कोर्टात काही पुरावे सादर करायचे असल्यास योग्यवेळी राज्य सरकारकडून पुरावेही सादर केले जातील, असे अनिल परब म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.