आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न:2 कोटी रोजगार पुढच्या जन्मी मिळतील का?

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पूर्ण करा; या गतीने दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का? असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अशा आशयाची पोस्ट करीत पंतप्रधानांवर शाब्दिक प्रहार केले आहेत. प्यारे देशवासियों, देशात 2014 पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने नागरिकांना दिलेली आश्वासने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना तोंडपाठ झाली आहेत. त्यापैकी वर्षाला दोन कोटी रोजगाराचे स्वप्न रंगवलेल्या मोदी सरकारने लाजेखातर निदान एक लाखाचा आकडा तरी पूर्ण करायचा होता. मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात दोन कोटींप्रमाणे एकूण १६ कोटी इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित होती. मात्र टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया करूनही रोजगार एक लाखापर्यंतही पोहोचत नाही, ही मोदी सरकारची नामुष्की म्हणावी लागेल. रोजगार एक लाखांपर्यंत पोहोचत नाही आणि या गतीने मोदी सरकारचा कारभार चालत राहिला तर युवकांना दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे देशात योग्य रोजगार निर्मिती होण्यासाठी २०२४ मध्ये सक्षम सरकारची निर्मिती करण्याची जबाबदारी आता सुजाण मतदारांची आहे.

बातम्या आणखी आहेत...