आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'या' प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांना सवाल:कराल काय स्वतःला अटक? स्वतःला फरफटत न्याल का? निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपकडून राज्यात आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका केली जात आहे.

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीला अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाईनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर लक्ष्य केले जात आहे. यावरुन आता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधाल आहे.

भाजपकडून राज्यात आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एका जुन्या घटनेची आठवण करुन दिली आहे. तुम्ही या घटनेनंतर स्वतःला अटक करुन घेणार का अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमधील काही स्क्रीनशॉट शेअर केले आहे. यामध्ये उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्या आहेत. 'कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो' असं निलेश राणे यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हणाले आहे.

दिलीप ढवळे यांनी 2019 मध्ये केली होती आत्महत्या
दिलीप ढवळे यांनी 2019 मध्ये आत्महत्या केली होती. ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत आहे. असे सुसाईड नोटमध्ये लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यांनी शेताततील झाडाला गळफास घेतला होता. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये उद्धव ठाकरे यांचेही नाव होते.