आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होण्याची चिन्हे दिसू लागताच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही मित्रपक्षांचे नेते परस्परविरोधी वक्तव्ये करू लागले आहेत.
सुरुवातीपासून महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा करणारे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी अचानक बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली. त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मित्रपक्षांना िवश्वासात न घेता शिवसेना नेत्यांनी कुठलीही भूमिका जाहीर करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. आघाडीबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो खुद्द मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी बोलून घ्यावा, अशी अपेक्षा छगन भुजबळ, जयंत पाटील, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राऊतांविरोधात नाराजीचा सूर पहायला मिळाला.
संजय राऊत : महाविकास आघाडीतून बाहेरही पडू, पण आधी मुंबईत यावे
‘शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी या सर्व आमदारांची इच्छा असेल तर २४ तासांत महाराष्ट्रात या. उद्धव ठाकरेंसमोर म्हणणे मांडा.
छगन भुजबळ : राऊतांनी सरकारमध्ये राहण्याबाबत पवार यांना कळवावे
राऊत यांनी विचार करून बोलावे. आघाडी सरकारमध्ये राहायचे का नाही, याबाबत त्यांचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कळवावा.
नाना पटोले : अजित पवार हे निधी देत नाहीत, त्रास देतात अशा तक्रारी
अजित पवार हे निधी देत नाहीत, त्रास देतात अशा तक्रारी सेना आमदारांनी केल्या. तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही केल्या होत्या.
अजित पवार : कुणाबाबतही दुजाभाव केला जात नाही
सरकार काम करतंय. तिन्ही पक्षाचे पालकमंत्री आहेत. कोणाबाबतही दुजाभाव केला जात नाही. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.