आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Wine Super Market | Sharad Pawar | Mahavikas Aghadi Maharashtra | Marathi News | 600 Supermarkets, Malls In The State Will Get Liquor Sales License; Approval In Cabinet Meeting, Skepticism Over Pawar's Role

मॉलमध्ये वाइन विक्री:राज्यात 600 सुपरमार्केट, मॉलला मिळणार वाइन विक्रीचा परवाना; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, पवारांच्या भूमिकेने संशयकल्लोळ

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरमार्केट - मॉलमध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्यावरून विरोधी पक्ष भाजपसह राज्यभर आघाडी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यात वाइन विक्रीचा निर्णय मागे घेतल्यास कुणाला वाईट वाटायचे कारण नाही, असे वक्तव्य बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यामुळे सरकार मागे हटणार, अशी चर्चा होती.

मात्र सकाळचे पवारांचे वक्तव्य शिळे होण्यापूर्वीच सायंकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत किराणा दुकानातील वाइन विक्रीच्या निर्णयावर ठाकरे सरकारने शिक्कामोर्तब केले. नियमांच्या अडथळ्यामुळे राज्यातील ६०० सुपरमार्केट- मॉलना वाइन विक्रीचा परवाना मिळू शकणार आहे. वाइन विक्रीच्या निर्णयावर बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाले. बैठकीनंतर याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

वाइन विक्रीचा निर्णय मागे घेतल्यास हरकत नसेल : शरद पवार
मुंबई | किराणा दुकानात वाइन विक्रीला परवानगी देण्यावरून आघाडी सरकारवर टीकेची झोड उठली असताना शरद पवार यांनी गुगली टाकली. वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला तर माझी काही हरकत नसेल आणि त्यात कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दारू व वाइन हा फरक समजावून घेण्याची भूमिका असली पाहिजे. पण जर विरोध होत असेल तर सरकारने निर्णय मागे घेतला तरीही माझी हरकत नसेल, असे पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...