आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पार पडणार अधिवेशन; विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. आज कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाचे अधिवेशन मागील वर्षाप्रमाणे मुंबई घेण्याची मागणी केली जात होती. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर कामकाज समितीने यंदाचे अधिवेशन हे नागपुरात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुका येत्या 10 डिसेंबरला पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात जाण्याची शक्यता होती. मात्र आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठेवण्यात आले आहे. अधिेवेशाचा कालावधी किती दिवसाचा असणार याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अधिवेशन नागपुरामध्ये घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढच्या वर्षी राज्यातील अनेक शहारांच्या महानगर पालिकांच्या निवडणुका देखील होणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दा देखील गाजत आहे. तसेच राज्यातील गांजा, ड्रग्स या मुद्द्यावरून देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

मागील हिवाळी अधिवेशन दोनच दिवसाचे
मागील वर्षी झालेले हिवाळी अधिवेशन दोनच दिवसात उरकण्यात आले होते. कोरोनाचा धोका असल्याने कामकाज समितीने हिवाळी अधिवेशन दोनच दिवसात आटोपण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विरोध आक्रमक झाले होते. तसेच महाविकास आघाडी सरकार प्रश्नांचे उत्तर देण्यास घाबरत असल्याची टीका देखील करण्यात आली होती.

गेल्या वर्षी नागपुरऐवजी मुंबईत पार पडले होते हिवाळी अधिवेशन
गेल्या वर्षीचे हिवाळी अधिवेशन नागपुरऐवजी मुंबई पार पडले होते. राज्यात कोरोनाचा धोका पाहता तसेच कामकाज समितीला नागपुरला जाणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मागचे अधिवेशन दोनच दिवसात आटोपण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांना जास्त वेळ मिळाला नव्हता. मात्र यंदाचे अधिवेशन नागपुराला होणार असून, विरोध अनेक मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला घेरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...