आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बराच गोंधळ उडाला. यावेळी पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकावर गंभीर आरोप केले आहेत.
गोपीचंद पडळकर त्यांच्या या आंदोलनाविषयी बोलताना म्हणाले की 'हे सरकार झोपले आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या पाठीमागे 16 मागण्या असणारा बोर्ड लिहिला होता तो मोडला आणि ढोल वाजवण्यापासून रोखण्यात आले आहे. आमची ही लोककला आहे आणि कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार रोखले आहे. मी सरकारचा निषेध करतो.' असे पडळकर म्हणाले आहेत.
विरोधात असताना आंदोलन करणारे नेते आता गप्प का?
गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवरही निशाणआ साधला आहे. तसेच अनेक आरोप सरकावर केले आहे. पडळकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेण्यात आलेली नाही. विरोधात असताना महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का आहेत? असा सवालही पडळकरांनी विचारला आहे.
दादागिरी मोडीत काढू
पडळकर यावेळी बोलताना म्हणाले की, 'धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनांसोबत हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणेही कठीण होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असे वाटत असेल, मात्र ती दादागिरी आम्ही मोडीत काढू' असा निर्धारही पडळकरांनी केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.