आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कार्यालयाच्या तोडफोडीवर न्यायालय:मुंबई महापालिकेला कोर्टाचा दणका; कारवाईला उच्च न्यायालयानं दिली स्थगिती, कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री कंगना रनोट आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहे.
  • मुंबईतील तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
  • महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या ऑफिसजवळ जमा झालेत, असे कंगना रनोटने म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली होती. बीएमसीने तिचे ऑफिस अवैध बांधकाम असल्याची 24 तासांत तिला दुसरी नोटीस पाठवली गेली.

उच्च न्यायालय म्हणाले...

कंगना रनोटच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पालिकेला दिले आहे. महापालिकेने उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. याप्रकरणी उद्या तीन वाजता सुनावणी होणार आहे.

कंगनाच्या याचिकेत काय?

उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती. दरम्यान कंगनाच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली होती. रिट याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टच्या पूर्ण खंडपीठाच्या आदेशानुसार कोविड-19 मुळे कोणतेही न्यायालय / ट्रिब्यूनल / प्राधिकरणाची तोडफोड करण्याचे आदेश 30 सप्टेंबरपर्यंत अमान्य आहेत. असे म्हटले आहे.

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदेशीर

दरम्यान कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी बीएमसीने बजावलेली नोटीस बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. याविषयी आम्ही कोर्टात आवाज उठवणार आहोत. कंगनाच्या अनुपस्थितीमध्ये बीएमसीचे कर्मचारी तिच्या कार्यालयात घुसले. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यामुळे बीएमसीच्या विरोधामध्ये ट्रेसपोसिंग आणि जबाबी कारवाईची नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे. थोड्याच वेळात यावर सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

बीएमसीने काय म्हटले होते

कंगनाने दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नाहीत, असे सांगत मुंबई महापालिकेने तिचे वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी (9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला होता. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली. दरम्यान तिच्या मुंबईस्थित घराबाहेर देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

माझ्या घरात कोणतेही अनधिकृत बांधकाम नाही

माझ्या घरात कोणतेही अनधिकृत बांधकाम नाही. तसेच शासनाकडून कोविडमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडफोडवर बंदी घालण्यात आली आहे. बॉलिवूड पाहा आता फॅसिज्म काय असते. असे म्हणत तिने लोकशाहीची हत्या असा हॅशटॅग दिला आहे.

... म्हणूनच माझी मुंबईत आता पीओके झाली आहे

कंगनाच्या कार्यालयाची बीएमसीकडून तोडफोड सुरू करण्यात आली. यानंतर कंगनाने ट्विट केले. पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनाने ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ असे लिहिले.

मी कधीच चुकीची नव्हते. माझे शत्रू वारंवार सिद्ध करत असतात की, माझी मुंबईत आता पीओके झाली आहे, असे ट्विट कंगनाने केले.

हे मंदिर पुन्हा बनवले जाईल - कंगना

कंगनाने ट्विट करत म्हटले की, 'मणिकर्णिका फिल्म्जमध्ये पहिली फिल्म अयोध्याची घोषणा झाली, ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिर आहे, आज येथे बाबर आला आहे. आज इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती करेल. राम मंदिर तोडले जाईल. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनवले जाईल, हे मंदिर पुन्हा बनवले जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम...'

कंगनाने नंतर थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला आहे.

कंगनाने मुंबईला रवाना होण्यापूर्वी देखील एक ट्विट केले होते.

कंगनाच्या अडचणीत सातत्याने होतेय वाढ
दरम्यान, कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेकेडून मंगळवारी नोटीस पाठवण्यात आली आणि आज तिच्या ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाला आहे. त्याशिवाय कंगनाविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने आज पुन्हा कंगनासाठी अपशब्दांचा वापर केला
शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा कंगनावर टीका केली आहे. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा या प्रकरणावरून टीका केली आहे.