आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यांना एक तारखेला पगार मिळतो, त्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही. व्यवस्थेमध्ये परवाने मिळायला खूप वेळ लागतो. व्यवस्थेतला प्रत्येक माणूस त्रास देतो. त्याला कंटाळून गुंतवणूकदार निघून जातात. मंत्री असल्यामुळे लोक आपल्यासमोर बोलत नाहीत. पण माल-पाणी दिल्याशिवाय कुणी फाईलच हलवत नाही, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बाबूशाहीचे वाभाडे काढले.
मुंबईत नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते शुक्रवारी (ता.६) बोलत होते. गडकरी यांच्या या बिनधास्त बोलण्याने एकच हशा पिकला.” महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे पाहत गडकरींनी आपल्या विधानात दुरुस्ती करत मी हे महाराष्ट्राबद्दल नाही बोलत तर बाहेरच्या राज्यांसाठी बोलतोय, अशी सारवासारव केली. गडकरी म्हणाले की, मला आतापर्यंत चार डिलीट पदव्या मिळाल्या आहेत. पण ज्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो, तेव्हा अकरावीला सायन्स मध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नव्हता. मात्र आता बांधकाम क्षेत्रात केलेल्या कामामुळे अनेक पुरस्कार मिळत आहेत. मला आश्चर्य वाटते की इंजिनिअरिंग केले नाही आणि आता पुरस्कार कसा घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.