आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव स्फोट:साक्षीदार  लष्करी अधिकारी फितूर, हा 25 वा साक्षीदार आहे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा निकटवर्तीय लष्करी अधिकारी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात फितूर झाला आहे. या खटल्यात फितूर झालेला हा २५ वा साक्षीदार आहे. गुरुवारी या लष्करी अधिकाऱ्याची विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर साक्ष झाली. त्या वेळी न्यायालयात उपस्थित पुरोहित यांना संबंधित अधिकाऱ्याने ओळखले.

एटीएसने याप्रकरणी आपली चौकशी केली, परंतु जबाब नोंदवलेला नाही, असे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याला फितूर घोषित केले. तपास संस्थेने नोंदवलेल्या जबाबाचे समर्थन केले नाही अथवा जबाब फिरवल्यास साक्षीदारास फितूर घोषित करते.

बातम्या आणखी आहेत...