आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य:सुषमा यांना ‘वुमेन अँड चाइल्ड आयकॉन इन आशिया’ पुरस्कार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला सक्षमीकरण, बालकल्याण व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा एस. चोरडिया यांना ‘वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट आयकॉन इन आशिया’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि एज्युकेशन पोस्ट यांच्यातर्फे नुकत्याच गोवा येथे आयोजित चौथ्या आशिया पॅसिफिक एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी समिटमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ‘उच्च शिक्षणातील भविष्यवेधी तंत्रज्ञान: एनईपी दृष्टीकोन’ अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेला जगभरातील विविध प्रतिष्ठित विद्यापीठांचे कुलपती, कुलगुरू यांच्यासह शिक्षणतज्ञ सहभागी झाले होते. सर्व स्तरावर दर्जेदार शिक्षण कसे उपलब्ध करून देता येईल, याबाबत या परिषदेत चर्चा झाली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षणतज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...