आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:दिवसा पुरुषांपेक्षा अर्ध्या अंश सेल्सियसपर्यंत जास्त उष्ण राहते महिलांच्या मेंदूचे तापमान

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत जास्त गरम असतो. रागाच्या नाही, तर तापमानाच्या हिशेबाने. महिलांच्या मेंदूचे तापमान पुरुषांच्या तुलनेत अर्ध्या अंशापर्यंत जास्त उष्ण असते. विशेषकरून दिवसा महिलांच्या मेंदूचे तापमान जवळपास ४०.९ अंश सेल्सियसपर्यंत जाते. केम्ब्रिजच्या एमआरसी लॅबोरेटरी फॉर मॉलिक्युलर बायोलॉजीच्या संशोधनानुसार, शरीराच्या उर्वरित भागांचे तापमान ३७ अंश सेल्सियसपर्यंत असते तेव्हा मेंदूचे सरासरी तापमान ३८.५ अंश सेल्सियस राहते. तथापि, मेंदूच्या आतील भागांचे तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत उष्ण असू शकते. संशोधनानुसार मेन्स्ट्रुअल सायकलमुळे महिलांच्या मेंदूचे तापमान अधिक असते. संशोधनात सहभागी डॉ. जॉन ओ’नील म्हणाले, ‘अनेकदा माणसाच्या मेंदूचे तापमान खूप जास्त वाढते. ही आश्चर्यकारक बाब संशोधनातून समोर आली आहे. शरीराचे इतके तापमान वाढले तर ते तापाच्या श्रेणीत येते. ज्यांच्या डोक्याला दुखापत झाली, अशा लोकांमध्येच इतके अधिक तापमान मापण्यात आले आहे.’

वय वाढण्यासोबतही वाढत जाते मेंदूचे तापमान : संशोधक
मेंदूचे तापमान वाढत्या वयासोबतही वाढत जाते. संशोधकांनुसार वाढत्या वयासोबत मेंदूला कूल डाऊन करण्याची क्षमता कमी व्हायला लागते. तथापि, असे एखाद्या मेंदूविकारामुळे होते किंवा नाही, यावर संशोधनाची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...