आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात मंत्रिपदावर असलेले अब्दुल सत्तार, रवींद्र चव्हाण, गुलाबराव पाटील यांनी केलेले आक्षेपार्ह वर्तन, उच्चारलेले शब्द व बेताल वक्तव्यामुळे राज्यातील समस्त महिलांचा अपमान झालेला आहे. त्यांनी मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे या सर्वांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी (ता.९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार व प्रवक्त्या डाॅ. मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्रांच्या लेकींचा नेहमीच देशभर सन्मान केला जातो. पण या आदर्श लेकींच्या संस्कारांना काळीमा फासण्याचे काम सरकारचे प्रतिनिधी करीत आहेत. सत्ताधारी मंत्री व आमदारांकडून महिलांविषयी बेताल व मानहानीकारक वक्तव्य करून राज्यातील महिलांचा अपमान होत आहे.
शिष्टमंडळात एकवटलेली महिला शक्ती या शिष्टमंडळात आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत-प्रभावळकर, माजी महापौर स्नेहल आंबेरकर, ज्योती ठाकरे, वैशाली नागवडे यांच्यासह अनेक महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.