आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पातून महिलांसह जनतेला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पाद्वारे महिला वर्गासाठी खास तरतूद करून सर्वसमावेश महिला धोरण अंगीकारले. एसटी बससेवेतील तिकीटदरात महिलांना पन्नास टक्के सवलत, सर्वच वयोगटातील महिलांच्या आरोग्यासाठी विशेष तरतूद आहे. मातोश्री रस्ते ग्रामपंचायत योजना, दुष्काळ मिटवण्यासाठी योजना यासह अनेक घोषणा आहेत. शिक्षण क्षेत्रासाठीही भरीव तरतूद आहे. याशिवाय शिक्षण सेवक, अंगणवाडी सेविका, यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
महिलाकेंद्रित पर्यटन धोरणही महिला सुरक्षित प्रवासासाठी महिलाकेंद्रित पर्यटन धोरण घोषित करण्यात आले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटींची तरतूद व महिला-मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचारांसाठी विशेष तरतूद आहे. शिष्यवृत्ती योजनेतही महिलांचा वाटा आहेच. द्वितीय अमृतसाठी ४३ हजार ०३६ कोटींची तरतूद पाहता यात महिलांसाठीचा वाटा निश्चितच लाभदायक ठरेल. अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांसाठी ५ हजार २०० व अंगणवाडी मदतनिसांसाठी ५,५०० रुपये अशी वाढ आहे. नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे ही घोषणा महत्त्वाची. पीडित महिलांना आश्रय, विधी, आरोग्य सेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यासाठी शक्तिसदनची घोषणा महिलांना आधार देणारी ठरेल.
निरोगी जीवनातून शक्ती लाडक्या लेकीच्या निरोगी जीवनाची काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. मग कोणत्याही आव्हानावर अशी सहज मात करण्याचे कौशल्यही येईल.
लेक लाडकी योजना महत्त्वाची लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, असा उल्लेख करत “लेक लाडकी योजना’ नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आली आहे. यात जन्मानंतर मुलींना पाच हजार रुपये, पहिलीत ४ हजार, सहावीत ६ , अकरावीत ८ हजार रुपये आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ७५ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना होणार आहे. सर्वसमावेशक अशा महिला धोरणाला अर्थसंकल्पाद्वारे विशेष स्थान देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.