आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उध्‍दव ठाकरे यांचे निर्देश:आगामी निवडणुकीच्या कामाला लागा

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता कामाला लागावे, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी समन्वय राखून कामाला लागा, आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचे आहे, असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. शिवसेना भवन येथे बुधवारी (२३ नोव्हेंबर) आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार, आमदार, माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका निवडणुकांपासून ते सिनेटपर्यंत सर्वच निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...