आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटलांचा केंद्र सरकारला टोला:तरुण रोज नोकरी गमावताय, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ; केंद्रातील कुंभकर्ण सरकारला केव्हा जाग येणार?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारला देशभरातील महत्त्वाच्या समस्यांची आठवण करुन दिली आहे.

देशाची राजधानी दिल्लीच्या दरवाज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, राज्यात महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहे. याच कारणावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने त्यांनी या विषयांवर केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

'देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला केव्हा जाग येणार? असे म्हणत जयंत पाटलांनी केंद्रावर निशाणा साधला. तसेच 'वर्ल्ड स्लीप डे' असं टॅगही जयंत पाटील यांनी केले आहे. 'शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?' असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे.

19 मार्च हा दिवस वर्ल्ड स्लीप डे म्हणून ओळखला जातो. जयंत पाटील यांनीदेखील आपल्या ट्वीटमध्ये वर्ल्ड स्लीप डे असं टॅग केले आहे. तसेच केंद्र सरकारला देशभरातील महत्त्वाच्या समस्यांची आठवण करुन दिली आहे. पाटलांनी मोदी सरकारला कुंभकर्णाची उपमा देत जाग करण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...