आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जागतिक व्याघ्र दिवस:केवळ शुभेच्छा देण्यापुरताच व्याघ्र दिवस असू नये, खाद्यांला खांदा लावून जंगलांच संरक्षण करणे गरजेचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज व्याघ्र दिवस आहे. 29 जुलै हा दिवस व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान भारतात इतर देशांच्या तुलने वाघांची संख्या ही जास्त आहे. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आहेत. व्याघ्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच जंगलांच संरक्षण करण्याचा संदेशही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.

वाघ हा माझ्या जीव्हाळ्याचा विषय आहे. आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात 300 च्या वरती वाघ आहेत. महाराष्ट्राची वनसंपत्ती ही मोठी आहे. ज्या जंगलात वाघ असतो तिकडचं निसर्गचक्र हे उत्तम असल्याचे मानले जाते. त्यामुळे निसर्गाचं संतुलन कायम राखण्यासाठी वाघांची जोपासना करणं हे जास्त गरजेचं आहे. सरकारसोबत नागरिकांचीही ही जबाबदारी आहे. त्यामुळे व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत न राहता, निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

यासोबतच केवळ शुभेच्छा देण्यापुरचा व्याघ्र दिवस असू नये. ज्या जंगलात वाघ असतो तिथले निसर्ग चक्र हे पूर्ण असतं. म्हणून वाघ असणं महत्त्वाचं आहे. सगळे जण खाद्यांला खांदा लावून जंगलांच संरक्षण करु शकलो तर तर चांगलं होईल. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्याघ्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘वाघ’ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यात भूमिका निभावू शकतात. भारतामध्ये जैवविविधतेचे आठ टक्के प्रमाण आहे. वृक्ष, निसर्ग, वन्यजीवन वाचवण्याची आणि जतन करण्याची भारतीय संस्कृती आहे. भारतात, जगातील वाघांच्या संख्येच्या ७० टक्के वाघ आहेत.