आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL प्रक्षेपणासाठी संघर्ष:जगातील प्रमुख अब्जाधीश जेफ बेजोस आणि मुकेश अंबानी आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी आले आमने सामने

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

जगातील प्रमुख अब्जाधीश जेफ बेजोस आणि मुकेश अंबानी भारतात ई-कॉमर्समधील आपल्या वर्चस्वासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. आता इंडियन क्रिकेट लीगच्या (आयपीएल) भारतात होणाऱ्या सामन्यांचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठीही त्यांच्यात संघर्ष पाहायला मिळू शकतो. हे दोन्हीही अब्जाधीश आपली बोली वाढवून एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतात.या आठवड्यात इंडियन क्रिकेट लीगने प्रसारण अधिकारांच्या लिलावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. सामन्यांचे टीव्हीवरील प्रसारण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगचे अधिकार वेगवेगळे विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोबतच अॅमेझॉन डॉट कॉम इंक आणि त्यांच्या प्राइम व्हिडिओ सेवेसाठी दरवाजे खुले होत आहेत. तर मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजही तयारीत असल्याचे दिसत आहे. 2017 मध्ये स्टार इंडियाने आयपीएलचे अधिकार 16,348 कोटींत घेतले होते. यंदा नियामक मंडळाला त्यांच्या लिलावातून 45 ते 50,000 कोटी कमाईची अपेक्षा आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या मते, जेफ बेजोस 14.46 लाख कोटी नेटवर्थसह जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, अंबानी 7.56 लाख कोटींसह दहाव्या स्थानी आहेत.

IPL प्रक्षेपण हक्कांच्या लिलावाचे टेंडर

IPL 2023-2027च्या पाच सीझनसाठी प्रक्षेपण हक्कांसाठी इन्व्हिटेशन टू टेंडर (ITT) जारी करताना BCCIने म्हटले की, पहिल्यांदाच IPL मीडिया राइट्सचा ई-लिलाव होणार आहे, जो 12 जूनपासून सुरू होईल. हे टेंडर 10 मेपर्यंत खरेदी करता येतील, ज्यासाठी 25 लाख रुपये + जीएसटीची रक्कम जमा करावी लागेल. BCCIचे सचिव जय शाह म्हणाले की, दोन नवीन संघ आणि आणखी जास्त सामन्यांच्या आयोजनातून IPL नवीन उंची गाठेल, अशी आम्हाला आशा आहे.

IPL 2023-2027 साठी मीडिया राइट्सची होणार विक्री

BCCI आणि IPLमधील संघांसाठी मीडिया राइट्स हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. IPLच्या एकूण कमाईपैकी सुमारे 70% कमाई यातून येते.

 • 2008 मध्ये IPLला सुरुवात झाली. याआधी, 2017 पर्यंत म्हणजे 10 सीझनसाठी मीडिया राइट्स सोनीने विकत घेतले होते. सोनीने यासाठी 8,200 कोटी रुपये खर्च केले होते.
 • 2018 मध्ये हे हक्क पुन्हा विकले गेले आणि यावेळी BCCIला त्याची किंमत जवळपास दुप्पट मिळाली. स्टार स्पोर्ट्सने 2018-2023 साठी म्हणजेच पाच वर्षांसाठी 16,347 कोटी रुपयांना IPL प्रसारण हक्क विकत घेतले होते.
 • आता 2023 ते 2027 या पाच वर्षांसाठी IPLचे प्रसारण हक्क पुन्हा विकले जाणार आहेत. मात्र, यावेळी BCCI हे हक्क एका पॅकेजऐवजी चार स्वतंत्र पॅकेजमध्ये विभागून विकणार आहे.
 • चार स्वतंत्र पॅकेजमध्ये हक्क विकून, BCCIला अनेक पटींनी जास्त किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, यासह एकापेक्षा जास्त कंपन्यांना हे अधिकार विकत घेण्याची संधी मिळणार आहे.

प्रसारण अधिकार किंवा मीडिया राइट्स म्हणजे काय?

ब्रॉडकास्टिंग राइट्सना अनेकदा मीडिया राइट्सही म्हणतात. याचा अर्थ एखादी कंपनी ठराविक कालावधीसाठी आणि ठराविक रकमेसाठी स्पोर्ट्स लीग चालवणाऱ्या संस्थेकडून त्या लीगचे सामने प्रसारित करण्याचा अधिकार विकत घेते.

उदाहरणार्थ, गेल्या 5 वर्षांपासून IPL सामने फक्त स्टार स्पोर्ट्स चॅनल आणि त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्म Hotstar वर प्रसारित केले जातात, याचे कारण म्हणजे स्टारने BCCI कडून 5 वर्षांसाठी 16347 कोटी रुपयांना हे हक्क विकत घेतले आहेत.

BCCI चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये मीडिया हक्क विकण्याची शक्यता

 • BCCI यावेळी IPL मीडिया हक्क चार स्वतंत्र पॅकेजेस किंवा बंडलमध्ये विकू शकते, ज्यामध्ये टेलिव्हिजन आणि डिजिटल अधिकार स्वतंत्रपणे ठेवले जातील.
 • मीडिया रिपोर्ट्सनुसार, 25 मार्च रोजी झालेल्या IPL गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे सर्व अधिकार आतापर्यंत एकाच कंपनीला मिळत होते. वेगवेगळ्या पॅकेजमध्ये हक्क विकण्याचा निर्णय BCCIने सल्लागार कंपनी केपीएमजीशी सल्लामसलत करून घेतला आहे.
 • या अंतर्गत पॅकेज A मध्ये टेलिव्हिजन अधिकारांचा समावेश असेल, पॅकेज B मध्ये डिजिटल अधिकारांचा समावेश असेल, पॅकेज C मध्ये नॉन-एक्सक्लुझिव्ह स्पेशल कॅटेगरीचा समावेश असेल (18 सामन्यांचे बंडल) आणि पॅकेज D मध्ये उर्वरित जगाच्या प्रसारण अधिकारांचा समावेश असेल.
 • तसेच, यावेळी अनेक ब्रॉडकास्टर्सना एक कंसोर्टियम तयार करून OTT प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी बोली लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजेच नुकतेच विलीन झालेले सोनी आणि झी यांना एकत्र बोली लावण्याची संधी मिळणार नाही, त्यांना स्वतंत्रपणे बोली लावावी लागेल.

2023 पासून IPL प्रसारणाच्या स्पर्धेत कोणत्या कंपन्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात

 • सध्या, स्टारकडे IPLचे प्रसारण हक्क आहेत, परंतु पुढील 5 सीझनच्या बोलीमध्ये त्यांना अनेक मोठ्या कंपन्यांना स्पर्धा द्यावी लागणार आहे.
 • वृत्तानुसार, देश-विदेशातील अनेक कंपन्या IPLचे प्रसारण हक्क विकत घेण्याच्या शर्यतीत सामील आहेत. स्टार व्यतिरिक्त, सोनी, झी, मेटा (फेसबुक), अॅमेझॉन, यूट्यूब (गुगल) आणि रिलायन्स (व्हायकॉम-18) या दिग्गज कंपन्या हे हक्क विकत घेण्याच्या शर्यतीत सामील आहेत.
 • गेल्या काही वर्षांत टीव्हीवर तसेच OTT सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर IPL पाहण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन मीडिया अधिकारांमध्ये डिजिटल अधिकार टीव्ही अधिकारांइतकेच महागडे विकले जातील, अशी BCCIला अपेक्षा आहे.
 • भारतातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्समध्ये स्टारचे हॉटस्टार, झीचे झी फाइव्ह, अमेझॉनचे अमेझॉन प्राइम आणि सोनीचे सोनी लिव यांचा समावेश आहे. या OTT प्लॅटफॉर्मवर IPL सामन्यांचे डिजिटल राइट्स विकत घेण्याची स्पर्धा असू शकते.
 • BCCI ज्या प्रकारे मीडिया हक्क वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये विकण्याच्या मूडमध्ये आहे, त्यावरून 2023-2027 या काळात काही कंपनी टीव्हीवर IPL दाखवतील आणि काही कंपन्यांना OTT म्हणजेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना दाखवण्याचे अधिकार मिळतील. एवढेच नाही, तर इतर काही कंपन्यांनाही भारताबाहेर उर्वरित जगात सामने दाखवण्याचा अधिकार मिळू शकतो.
बातम्या आणखी आहेत...