आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरळी पोलिसांची कारवाई:लसीकरणाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक, हाताच्या टॅटू वरून आरोपी महिलेची पटली ओळख

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरळी पोलीसांनी दिपाली म्हात्रे नावाच्या महिलेला अटक केली आहे.

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच सर्व नागरिकांनी लसीकरण लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. अश्या परिस्थितीत प्रत्येक नागरिक लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करतोय मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत मुंबईच्या वरळी परिसरातील गोपचार सोसायटीत लसीकरणाच्या नावाखाली घरात दरोडा टाकणाऱ्या एका महिलेला वरळी पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

वरळी पोलिसांनी दिपाली म्हात्रे नावाच्या महिलेला अटक केली आहे. 5 मे रोजी हिने वरळीच्या गोपचार इमारतीत राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेला आणि तिच्या नातवाला घरात चाकूच्या धाकावर बांधून साडेचार लाखांचे सोनं लुटलं होतं. यात विशेष बाब म्हणजे आरोपी महिला देखील याच इमारतीच्या बाजूला राहणारी असून तिने ओळख लपवण्यासाठी तोंडाला स्कार्फ बांधला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चोरी झालेल्या इमारत परिसरात सीसीटिव्ही नसल्याने आरोपी महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. अशातच वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतराव चौधरी यांच्या पथकाने वृद्ध महिलेकडे सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी महिलेच्या हातावर झाडच्या वेलीचे टॅटू असल्याचे सांगितले. ही आरोपी महिला जवळचीच व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय होता. आणि हा संशय त्यांचा खरा निघाला.

आरोपी महिला ही वारंवार पोलिस तपास कोणत्या दिशेने करत आहे याची माहीती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती यामुळे पोलीसांचा संशय बळवली आणि चौकशी दरम्यान वेळी तिच्या हातावरील टॅटूची ओळख पटली आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या दिपाली पोलिसांच्या कस्टडीत आहे आणि पोलीस यातला अधिक तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...