आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी आरक्षण:एम्पेरिकल डेटासाठी आडनाव गृहीत धरणे चुकीचेच : पटोले

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होण्यासाठी एम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्यात आडनावे गृहीत धरली जात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापू लागले असतानाच फक्त आडनाव गृहीत धरणे चुकीचे असल्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंगळवारी (१४ जून) लक्ष वेधले आहे. ही पद्धत चुकीची असून ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सूचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. नाना पटोले पत्रात म्हणतात की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...